बातम्या

जबरी चोरी व चेन स्नॅचिंग प्रकरणी एकाला अटक.

One arrested in connection with robbery and chain snatching


By nisha patil - 10/6/2025 9:45:40 PM
Share This News:



जबरी चोरी व चेन स्नॅचिंग प्रकरणी एकाला अटक.

जबरी चोरी व चेन स्नॅचिंग प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरोळ तालुक्यातील उदगाव येथून एकाला अटक केली. इनु उर्फ मेहंदी हसन अक्रम अली उर्फ सय्यद उर्फ इराणी असं आरोपीचे नाव आहे. हा आंतरराज्य चोरटा कर्नाटक राज्यातील बिदर इथला रहिवासी आहे. त्याच्याकडून ३७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 3 चेन व एक मोपेड असा एकूण चार लाख 53 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. अधिक चौकशीत  जबरी चोरीचे पाच् गुन्हे व मोपेड चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. या चोरी प्रकरणात  लखन उदय वसवाडे या शिरोळ येथील त्याच्या साथीदाराचाही समावेश आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, जालिंदर जाधव  यांच्यासह पथकाने केली.


जबरी चोरी व चेन स्नॅचिंग प्रकरणी एकाला अटक.
Total Views: 152