बातम्या
पन्हाळगड मार्गावर एकेरी वाहतूक; पावसाचा जोर कायम
By nisha patil - 8/20/2025 2:35:33 PM
Share This News:
पन्हाळगड मार्गावर एकेरी वाहतूक; पावसाचा जोर कायम
प्रतिनिधी – शहाबाज मुजावर आज दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दोन वाजता पन्हाळगडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सध्या फक्त एकेरी वाहतूक सुरू आहे. सतत सुरू असलेल्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले असून वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पावसाचा जोर असाच कायम राहिला तर हा मार्ग पूर्णपणे बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गडाकडे जाणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांना प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
पन्हाळगड मार्गावर एकेरी वाहतूक; पावसाचा जोर कायम
|