बातम्या

११ कोटींची ऑनलाईन फसवणूक उघडकीस – पुण्यातील टोळीतील ५ जण अटकेत, ४८ लाख रुपये गोठवले

Online fraud of Rs 11 crore exposed


By nisha patil - 8/7/2025 6:21:45 PM
Share This News:



११ कोटींची ऑनलाईन फसवणूक उघडकीस – पुण्यातील टोळीतील ५ जण अटकेत, ४८ लाख रुपये गोठवले

सम्राटनगरमधील सेवानिवृत्त प्राध्यापिका आणि देवकर पाणंद येथील ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ११ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ऑनलाईन टोळीचा छडा लावत कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, ४८ लाखांची रक्कम पोलिसांनी बँक खात्यांतून गोठवली आहे.

पोलिस तपासात उघड झाले की, ही टोळी पुण्यातील हॉटेलमध्ये बनावट पोलिस आणि कोर्टाचा सेटअप तयार करून नागरिकांना धमकावत होती. टोळीचा मुख्य सूत्रधार क्षितिज सुतार असून, त्याने संपूर्ण नेटवर्क चालवले. फसवणुकीतील रक्कम बंडू राठोड या आरोपीच्या खात्यावर वर्ग झाल्यानंतर ती इतर खात्यांत वळवण्यात आली.

या टोळीतील काहींचा राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांमध्ये थेट सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले आहे. दोन्ही गुन्ह्यांत वापरलेली बँक खाती आणि आरोपी समान असल्यामुळे टोळ्यांमधील संबंध उघड झाला आहे.

फसवणुकीप्रकरणी मुंबईतीलही काही नागरिक फसले असल्याची माहिती समोर आली असून, मुंबई पोलिसांनी कोल्हापुरात येऊन आरोपींची चौकशी सुरू केली आहे. उर्वरित खातेदारांचा शोध आणि रक्कम रोखण्यासाठी बँकांशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.


११ कोटींची ऑनलाईन फसवणूक उघडकीस – पुण्यातील टोळीतील ५ जण अटकेत, ४८ लाख रुपये गोठवले
Total Views: 114