ताज्या बातम्या
ऑनलाईन तिकीट बुकिंग करताना फक्त आधार लिंक यूजर्सनाच मिळणार पहिली संधी!
By nisha patil - 9/16/2025 12:39:54 PM
Share This News:
नवी दिल्ली : रेल्वेने तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल करत सामान्य प्रवाशांना दिलासा दिला आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून आयआरसीटीसी वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत फक्त आधार-प्रमाणित यूजर्सनाच तिकीट बुक करता येईल.
👉 या निर्णयामुळे :
• ✅ सामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार
• 🚫 दलाल आणि एजंटची मनमानी थांबणार
• 🕒 अधिकृत एजंटसाठी असलेली १० मिनिटांची बंदी कायम राहणार
• 🎫 स्थानकांवरील काऊंटर बुकिंगमध्ये मात्र कोणताही बदल नाही
रेल्वेच्या मते, या उपक्रमामुळे “तिकीट बुकिंगचा हक्क सामान्य प्रवाशांच्या हातात परत येईल.”
ऑनलाईन तिकीट बुकिंग करताना फक्त आधार लिंक यूजर्सनाच मिळणार पहिली संधी!
|