बातम्या
धग सोसणाऱ्यालाच यशाची शिखरं गाठता येतात : इंद्रजित देशमुख
By nisha patil - 4/28/2025 1:35:40 PM
Share This News:
धग सोसणाऱ्यालाच यशाची शिखरं गाठता येतात : इंद्रजित देशमुख
प्राचार्य सूर्यकांत चव्हाण यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
एस.एम. लोहिया हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत चव्हाण यांच्या सेवानिवृत्ती गौरव समारंभात माजी प्रशासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी "मोठं होण्यासाठी धग सोसण्याची तयारी हवी" असे प्रभावी प्रतिपादन केले. हजारोंच्या उपस्थितीत तळपत्या उन्हात झालेल्या या कार्यक्रमात सूर्यकांत चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोदकुमार लोहिया होते. ज्येष्ठ लेखक सुनीलकुमार लवटे, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत संस्थांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे आयोजन सयाजीराव पाटील, सागर बगाडे, अमोल जाधव यांनी केले. मनमोहक रांगोळी, जीवनपटाची चित्रफीत, 'सूर्यकांत' विशेषांक प्रकाशन आणि स्नेहभोजनाने कार्यक्रम अधिक खुलला. शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धग सोसणाऱ्यालाच यशाची शिखरं गाठता येतात : इंद्रजित देशमुख
|