बातम्या

हमीदवाडा रस्ता तातडीने खुला करा; अन्यथा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Open Hamidwada road immediately


By nisha patil - 11/16/2026 2:45:57 PM
Share This News:



हमीदवाडा रस्ता तातडीने खुला करा; अन्यथा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

कागल : अजित बोडके हमीदवाडा गावाकडे जाणारा रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले. रस्ता बंद असल्याने नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रस्त्यावरून शेतकरी सातपुते यांनी आपल्या शेतातून रस्ता जात असल्याचे कारण देत रस्ता बंद केला आहे. त्यामुळे हमीदवाडा गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्ता बंद होऊन बारा दिवस उलटले तरी प्रशासनाकडून तो सुरू करण्यासाठी ठोस प्रयत्न झाले नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

संबंधित विभागाने अधिकृत रस्ता तातडीने सुरू करावा. तसेच जिल्हा मार्ग क्रमांक १९० नेमका कोठून जातो, याची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या रस्त्यासाठी यापूर्वी शासनाकडून निधी उपलब्ध करून खर्च करण्यात आला असल्याने प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष घालून नागरिकांची गैरसोय दूर करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.

हमीदवाडा रस्ता (सर्व्हे क्रमांक १९०, गट क्रमांक ४६, सदाशिवनगर) तातडीने खुला न केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, जिल्हा संघटक संभाजी भोकरे, उपजिल्हाप्रमुख जयसिंग टिकले, तालुकाप्रमुख अजित मोडेकर, अशोक पाटील, समीर देसाई, नवनाथ पाटील, नितीन डावरे, सुहास उपासे, अमृत पाटणकर, राजेंद्र साबळे, नितीन भोकरे, महेश जाधव, दादासाहेब पाटील, सावंता कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


हमीदवाडा रस्ता तातडीने खुला करा; अन्यथा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
Total Views: 18