बातम्या

महाराष्ट्रातील युवकांना परदेशी रोजगाराची संधी 

Opportunities for overseas employment


By nisha patil - 9/21/2026 11:16:07 PM
Share This News:



महाराष्ट्रातील युवकांना परदेशी रोजगाराची संधी 

आज दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या गोलमेज परिषदेत कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा साहेब तसेच प्रोटोकॉल मंत्री श्री जयकुमार रावल साहेब तसेच मित्र संस्थेचे उपाध्यक्ष माननीय आमदार श्री राजेश क्षीरसागर साहेब, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रवीण परदेशी साहेब कौशल्य विकास आयुक्त व महिमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अमित सैनी यांच्या समवेत फ्रान्स जर्मनी युनायटेड किंगडम जपान रशिया या देशांचे दूत उपस्थित होते. 
 

सदर परिषदे मध्ये महाराष्ट्रातील युवकांना विविध देशांमध्ये स्किल डेव्हलपमेंट, भाषा, नर्सिंग व इतर प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी करार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने महिमा ही नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदर एजन्सी मार्फत राज्यातल्या युवकांना युवकांना राज्यातल्या युवकांना विविध प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध करून देण्याबाबत प्लॅटफॉर्म तयार केला गेला आहे. सदर प्लॅटफॉर्म द्वारे युवकांना प्रदेशात जाण्याकरिता तसेच परदेशातील रोजगार संबंधी चे शिक्षण महिमा या संस्थेमार्फत देण्यात येईल. प्रदेशात जाण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता होण्यासाठी महिमा संस्थेतर्फे मदत केली जाईल. तसेच आपल्या कुशल युवकांची परदेशातील सुरक्षितता, गरज भासेल तेव्हा त्यांना आवश्यक ती कायदेशीर मदत पुरवणे आणि त्यांच्या सुरक्षित परतीसाठी पुरेशी यंत्रणा उभी करून देणे हे महिमा संस्थेचे प्रमुख कार्य असेल. 
 

मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर साहेबांनी पश्चिम महाराष्ट्रातील युवकांना खास करून कोल्हापूर सांगली व सातारा या भागातील तरुणांना परदेशात नोकरी उपलब्ध करून देण्यासाठीचे निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिले.

कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील युवा वर्गासाठी विशेष आग्रह : आमदार राजेश क्षीरसागर
पश्चिम महाराष्ट्रातील युवकांना या जागतिक रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मी आजच्या बैठकीत मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे विशेष निवेदन केले आहे. विशेषतः कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील युवकांना या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळावा, यासाठी या भागात कौशल्य प्रशिक्षण, भाषा प्रशिक्षण आणि परदेशी रोजगार मार्गदर्शनाची प्रभावी यंत्रणा उभी करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूरच्या युवकांनी केवळ महाराष्ट्रात किंवा भारतातच रोजगार शोधावा असे नाही, तर जगाच्या रोजगार बाजारपेठेत आपली क्षमता सिद्ध करावी, हा माझा प्रयत्न आहे असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

यामुळे होणारे फायदे खालील प्रमाणे आहेत 
परकीय चलन भारतात / महाराष्ट्रात आणले जाईल त्यामुळे त्यांच्या प्रगती सोबत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल. तरुणांचे कौशल्य वाढवणे, त्यांना सुरक्षित आणि कायदेशीर रोजगाराच्या संधी देणे, त्यांच्या कुटुंबांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यातून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक सक्षम करणे हा या उपक्रमाचा व्यापक उद्देश आहे.  हा उपक्रम महाराष्ट्राच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग बनवता येईल.


महाराष्ट्रातील युवकांना परदेशी रोजगाराची संधी 
Total Views: 5