बातम्या
संधी मिळाली, आता लोकाभिमुख कामाची वेळ – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
By nisha patil - 4/10/2025 3:23:40 PM
Share This News:
संधी मिळाली, आता लोकाभिमुख कामाची वेळ – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर, दि. ४ : राज्य शासनाच्या सुधारित अनुकंपा धोरणामुळे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ३१२ उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्ती मिळाली. सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महासैनिक दरबार हॉल येथे नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, “गेल्या दहा वर्षांच्या संघर्षानंतर ही संधी मिळाली आहे. आता लोकाभिमुख काम करून जनतेचा विश्वास जिंकण्याची वेळ आली आहे.”
तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी नवनियुक्तांना शुभेच्छा देत, “चांगल्या कामातून समाजासाठी आदर्श घडवा,” असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अनुकंपा धोरणामुळे भरती प्रक्रियेला वेग आल्याचे सांगितले.
जिल्ह्यात अनुकंपा अंतर्गत ९७ उमेदवारांना आणि सरळ सेवेतून १४८ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक तरुणांना या माध्यमातून रोजगाराची संधी मिळाली आहे.
संधी मिळाली, आता लोकाभिमुख कामाची वेळ – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
|