राजकीय
विरोधकांनी ईव्हीएमवर आरोप करण्याऐवजी वस्तूस्थिती स्वीकारावी – मंत्री प्रकाश आबिटकर
By nisha patil - 12/23/2025 12:56:19 PM
Share This News:
कोल्हापूर:- जिल्ह्यातील १३ पैकी ११ नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, महायुतीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात केलेल्या कामावर जनता समाधानी आहे आणि निकाल हे याच कामगिरीचा परिणाम आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये महायुतीकडून काही ठिकाणी एकमेकांविरुद्धही सामना झाला, तरीही प्रदेशातील कामाच्या विश्वासामुळेच यश मिळालं, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
आबिटकर म्हणाले की, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि याच बळावर आगामी बड़ी निवडणुकांमध्येही महायुतीला चांगले निकाल मिळतील, अशी त्यांची अपेक्षा आहे.
विरोधकांनी ईव्हीएमवर आरोप करण्याऐवजी वस्तूस्थिती स्वीकारावी – मंत्री प्रकाश आबिटकर
|