बातम्या
नाट्यगृहाच्या छताचे काम १० दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश
By nisha patil - 4/19/2025 5:00:20 PM
Share This News:
नाट्यगृहाच्या छताचे काम १० दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश
प्रशासक मंजुलक्ष्मी यांची पाहणी, कामाला गती देण्याचे निर्देश
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बाधणीतील छताचे काम १० दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिले. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी कामाची पाहणी करून दुसऱ्या टप्प्यातील काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना ठेकेदार व्ही. के. पाटील यांना दिल्या.
तिसऱ्या टप्प्यासाठी आलेल्या निविदांची तांत्रिक छाननी करून लवकरात लवकर ठेकेदार निश्चित करण्याचे निर्देश शहर अभियंत्यांना देण्यात आले. तालीम संघ व गाळ्यांच्या जागेसाठी डीपीआर व अंदाजपत्रक तयार करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, मिलिंद पाटील, नाट्यगृह व्यवस्थापक समीर महाब्री, ठेकेदार व्ही. के. पाटील उपस्थित होते.
नाट्यगृहाच्या छताचे काम १० दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश
|