बातम्या
शक्तिपीठ महामार्गाला पर्याय तपासण्याचे आदेश
By nisha patil - 8/28/2025 11:08:31 PM
Share This News:
शक्तिपीठ महामार्गाला पर्याय तपासण्याचे आदेश
आजरा (हसन तकीलदार) (प्रतिनिधी): शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढ्याला मोठे यश मिळाले असून, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील मूळ आखणी रद्द करण्यात आली आहे. अवर सचिव राजेश भोगले यांनी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 अंतर्गत अधिसूचना काढून पर्यायी मार्गांचा अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत.
शक्तिपीठ महामार्गामुळे पर्यावरण आणि शेतजमिनींचे अपरिमित नुकसान होणार असल्याचा मुद्दा मांडत, आ. सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे आणि कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने व मोर्चे काढण्यात आले होते.
कॉ. संपत देसाई यांनी सांगितले की, “हा शेतकऱ्यांचा आणि पर्यावरणप्रेमींचा विजय आहे. पण शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहील.”
शक्तिपीठ महामार्गाला पर्याय तपासण्याचे आदेश
|