राजकीय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तारखेपर्यंत घेण्याचे आदेश...
By nisha patil - 9/16/2025 3:22:35 PM
Share This News:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तारखेपर्यंत घेण्याचे आदेश...
रखडलेल्या स्थानिक निवडणुकांवर शिक्कामोर्तब; न्यायालयाने दिली अंतिम मुदत
राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवर महत्त्वाची सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्ट आदेश देत ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडाव्यात, असे निर्देश दिले आहेत.
यामुळे बराच काळ प्रलंबित असलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, आता राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तारखेपर्यंत घेण्याचे आदेश...
|