बातम्या
स्त्रीभ्रूणहत्येवर संताप; दोषींवर मोक्का लावण्याची मागणी — संजय पवार
By Administrator - 7/4/2026 4:43:51 PM
Share This News:
स्त्रीभ्रूणहत्येवर संताप; दोषींवर मोक्का लावण्याची मागणी — संजय पवार
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या स्त्रीभ्रूणहत्येच्या घटनांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता शिष्ट मंडळ जिल्हा पोलीस प्रमुख साहेब यांना निवेदन देण्यात आले. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रकारांमुळे प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी केला.यामध्ये पालकमंत्र्यांचा देखील दोष आहे संजय पवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे.
दिवसाढवळ्या पैसे घेऊन स्त्रीभ्रूणहत्या केल्या जात असून भविष्यात समाजातील मुलींचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणांमध्ये केवळ तात्पुरती कारवाई न करता संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हे दाखल करून मोक्का कायदा लावण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच, गर्भलिंग तपासणीसाठी वापरली जाणारी यंत्रे व औषधे कुठून येतात याचा सखोल तपास करून संपूर्ण साखळी उघड करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सध्या तपास करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचे कौतुक करत दोषींना कोणतीही सवलत देऊ नये, असेही त्यांनी म्हटले.
अशा घटना थांबल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत, नागरिकांनीही माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन संजय पवार यांनी केले.
यावेळी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, उबाठा गटाचे युवा नेते मंजीत माने, विजय देवणे, उबाठा उपजिल्हाप्रमुख स्मिता सावंत मांडरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी
स्त्रीभ्रूणहत्येवर संताप; दोषींवर मोक्का लावण्याची मागणी — संजय पवार
|