खेळ
"जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शारीरिक अपंगत्वावर मात"
By nisha patil - 2/16/2026 3:22:19 PM
Share This News:
"जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शारीरिक अपंगत्वावर मात"
शेंडूर प्रतिनिधी (अजित बोडके):- कोल्हापूरचा सुपुत्र कु. प्रथम रामभाऊ इंगळे याने अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या 'नॅशनल बोसिया पॅरा ऑलिम्पिक' स्पर्धेत देदीप्यमान यश संपादन केले त्याबद्दल अभिनंदन केले.
संपूर्ण देशातून आलेल्या खेळाडूंना कडवी झुंज देत प्रथमने द्वितीय क्रमांक पटकावला आणि रौप्य पदकावर आपले नाव कोरले.अहमदाबाद येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील विविध राज्यांतील नामवंत पॅरा खेळाडू सहभागी झाले होते. बोसिया सारख्या अत्यंत कौशल्यपूर्ण खेळात प्रथमने आपल्या अचूक तंत्राचा वापर करत एकामागून एक फेऱ्या जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. देशात दुसरा क्रमांक मिळवून रौप्य पदक जिंकले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता रामराव इंगळे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील चंद्रकांत फराकटे प्रा. रूपाली इंगळे सुखदेव मेथे आदीप्रमुख उपस्थित होते.
"जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शारीरिक अपंगत्वावर मात"
|