बातम्या

*राहत खिदमत फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Overwhelming response to Rahat Khidmat Foundations blood donation camp


By nisha patil - 3/10/2026 1:46:52 PM
Share This News:



*राहत खिदमत फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

*आजरा(हसन तकीलदार):-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सत्य, अहिंसा व मानवसेवेच्या विचारांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने राहत खिदमत फाउंडेशन आजरा यांच्या वतीने भाई भाई थिएटर येथील त्यांच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
   

डॉ. मलिका शेख यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. प्रास्ताविक बबलू शेख यांनी केले.वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर व संत गजानन ब्लड स्टोरेज, महागाव यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे राहत खिदमत फाउंडेशनने आयोजन केले होते. यावेळी एकूण 83 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. अशी माहिती राहत फाउंडेशनचे अध्यक्ष मौजुद माणगावकर यांनी  दिली. उदघाटन प्रसंगी डॉ. मलिका शेख म्हणाल्या की, रक्तदान हे केवळ सामाजिक दायित्व नसून एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याचे महान कार्य आहे. या सेवाभावी उपक्रमात समाजातील युवक,युवतीनी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग वाढावा आणि रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत मदत उपलब्ध व्हावी हाच या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या पवित्र आणि समाजउपयोगी कार्यात आपला सहभाग अत्यावश्यक आहे. रक्तदानाच्या या मानवतावादी उपक्रमास समाजाच्या सर्व स्तरातून सहकार्य होणे गरजेचे आहे.
     

यावेळी रक्तदात्यांना भेटवस्तूही देण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवारांना राहत खिदमत फाउंडेशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांच्या हस्ते वृक्षरोपे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ब्लड बँकेचे डॉ. हार्डीकर, अंकिता बसारे, सुपरवायझर रेखा कांबळे, टेक्निशियन शिवाजी दरेकर, सृष्टी पाटील, रणजित पाटील, सूरज लोहार, आकाश बामणे तसेच आजरा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सागर तेउरवाडकर, सोपान भागवत, ताहीर शेख, अमीर मुजावर, पांडुरंग पाटील तसेच राहत खिदमत फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.युनूस जंगी यांनी आभार मानले.


*राहत खिदमत फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
Total Views: 122