बातम्या

घरफाळा मिळकत नाव हस्तांतरण शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

Overwhelming response to the property tax name transfer camp


By Administrator - 8/7/2026 6:43:29 AM
Share This News:



घरफाळा मिळकत नाव हस्तांतरण शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर ता.07: महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. 4, छत्रपती ताराराणी मार्केटकडीलघरफाळाविभागा अंतर्गत मिळकत नांव हस्तांतर करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजनकरण्यात आले होते. 

या विशेष शिबिरामध्ये सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 या कालावधीत नांव हस्तांतरण करण्यासाठीएकूण 53 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 49 अर्ज परिपूर्ण कागदपत्रास सादर झालेने प्राप्त अर्जाची समक्ष कागदपत्रांची छाननी करुन तात्काळ नांव हस्तांतरण प्रक्रीया पूर्ण करण्यात आलेली आहे. याबाबत उपस्थित संबंधित मिळकतधारकांना नाव हस्तांतरणाबाबतचे प्रमाणपत्रही यावेळी प्रदान करण्यात आले.या शिबिरामध्ये प्राप्त अर्जांपैकी 49 अर्जांची नांव हस्तांतरण शुल्क म्हणून खरेदी दस्ताच्या 0.1 टक्के प्रमाणे रक्कम 5 लाख 25 हजार 120 भरणा करुन घेण्यात आलेली आहे.

या विशेष शिबिरास उप-आयुक्त परितोष कंकाळ, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, कर अधिक्षक अर्चना प्रभावळे व विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.


घरफाळा मिळकत नाव हस्तांतरण शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद
Total Views: 13