शैक्षणिक
पी.एम. श्री विद्यामंदिरात उत्साहात प्रवेशोत्सव"
By nisha patil - 6/16/2025 10:27:04 PM
Share This News:
पी.एम. श्री विद्यामंदिरात उत्साहात प्रवेशोत्सव"
विद्या मंदिरात पहिल्यांदाच पाय ठेवणाऱ्यांचे औक्षण करून स्वागत"
पी.एम. श्री विद्यामंदिर, कणेरीवाडी येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 चा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला.दि. 16 जून 2025 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाला पंचायत समिती करवीरचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री. पी. एस. आंग्रे साहेब, सरपंच सौ. शामल कदम, उपसरपंच सीमा खोत, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजयकुमार मोरे, ग्रामपंचायत सदस्य, शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक जी. व्ही. कांबळे सर, शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रवेशोत्सवात इयत्ता पहिलीमध्ये 90 हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. विद्यार्थ्यांचे औक्षण, गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी “पहिले पाऊल शाळेकडे” हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला, ज्यात विद्यार्थ्यांना खाऊ देऊन त्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रम शिक्षक व पालकांच्या सक्रिय सहभागातून अत्यंत उत्साहात पार पडला.
पी.एम. श्री विद्यामंदिरात उत्साहात प्रवेशोत्सव"
|