बातम्या
PRSI, कोल्हापूर चॅप्टरकडून राष्ट्रीय जनसंपर्क दिवस साजरा करण्याकरिता निमंत्रण व नोंदणी लिंक
By nisha patil - 4/19/2026 12:25:02 AM
Share This News:
*PRSI, कोल्हापूर चॅप्टरकडून राष्ट्रीय जनसंपर्क दिवस साजरा करण्याकरिता निमंत्रण व नोंदणी लिंक*
२१ एप्रिल हा राष्ट्रीय जनसंपर्क दिवस म्हणून साजरा केला जातो. पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) ही जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्था असून देशभरात त्यांचे अनेक चॅप्टर आहेत. राज्यात मुंबई, नागपूरनंतर कोल्हापुर चॅप्टर नुकतेच जाहीर झाले आहे.
कोल्हापुर चॅप्टरकडून राष्ट्रीय जनसंपर्क दिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर चॅप्टरचे उद्घाटन कार्यक्रम व PR Meet चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जनसंपर्क/माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून त्यांच्याशी संवाद साधण्याची, अनुभवाचे आदानप्रदान करण्याची संधी जनसंपर्क-जाहिरात प्रतिनिधी, पत्रकार, माध्यम क्षेत्रातील विद्यार्थी यांना उपलब्ध होणार आहे.
२१ एप्रिल २०२६ रोजी ‘जनसंपर्क लोकशाहीचा पाचवा स्तंभ’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या संख्याशास्त्र विभागाच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम जनसंपर्क-जाहिरात प्रतिनिधी, पत्रकार, माध्यम विद्यार्थी यांच्याकरता विनामुल्य असून सहभागींना प्रमाणपत्र ही देण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर अल्पोपहारची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्याकरता सोबतच्या लिंकवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
*नोंदणी लिंक - *https://forms.gle/hoVVKujSznQAWazn7*
*टीम - PRSI, कोल्हापूर चॅप्टर*
PRSI, कोल्हापूर चॅप्टरकडून राष्ट्रीय जनसंपर्क दिवस साजरा करण्याकरिता निमंत्रण व नोंदणी लिंक
|