बातम्या
वळीवडे येथील पंचकल्याणक महोत्सवाला आमदार डॉ. विनय कोरे यांची भेट; जैन समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
By nisha patil - 4/19/2025 4:55:32 PM
Share This News:
वळीवडे येथील पंचकल्याणक महोत्सवाला आमदार डॉ. विनय कोरे यांची भेट; जैन समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
वळीवडे (ता. करवीर) | येथे सुरू असलेल्या श्री पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवास आज आमदार डॉ. विनय कोरे (सावकार) यांनी भेट देऊन दर्शन घेतले. या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रसंगी वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील (मामा), महोत्सव कमिटीचे अध्यक्ष महावीर पाटील, उपाध्यक्ष राजगोंडा वळीवडे, प्रकाश बापूसो पासाळे, संजय बापूसो चौगुले, विजयकुमार चौगुले यांच्यासह जैन समाजाचे अनेक मान्यवर, समाजबांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव हा जैन धर्मातील अत्यंत पवित्र व महत्त्वाचा सोहळा असून, यामध्ये पंचकल्याणक (गर्भ, जन्म, दीक्षा, ज्ञान व मोक्ष) या पाच प्रमुख घटनांचा गौरव केला जातो. या महोत्सवात धार्मिक विधी, प्रवचनं, भजनं आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. विनय कोरे यांनी महोत्सवाचे आयोजन करणाऱ्यांचे कौतुक केले तसेच समाजामध्ये धार्मिक एकतेचा संदेश देणाऱ्या अशा उपक्रमांना नेहमीच पाठिंबा राहील असे प्रतिपादन केले.
वळीवडे येथील पंचकल्याणक महोत्सवाला आमदार डॉ. विनय कोरे यांची भेट; जैन समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
|