राजकीय

पंचगंगा घाटाचा होणार कायापालट; आ. राहुल आवाडेंकडून पाहणी!

Panchganga Ghat will be transformed


By nisha patil - 11/13/2026 7:47:35 PM
Share This News:



पंचगंगा घाटाचा होणार कायापालट; आ. राहुल आवाडेंकडून पाहणी!

इचलकरंजी शहराच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या पंचगंगा नदी घाटाच्या विकासाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. नदी घाटाचे सुशोभीकरण करून परिसर अधिक सुंदर, स्वच्छ आणि सुविधायुक्त करण्याच्या दृष्टीने आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

यावेळी नदी घाट परिसराची स्वच्छता, सुशोभीकरण, नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधा आणि पर्यावरणपूरक विकास याबाबत आढावा घेण्यात आला. परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रस्तावित कामांचे नियोजन आणि आवश्यक उपाययोजनांबाबत आमदार आवाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विशेष म्हणजे, पंचगंगा नदी घाट परिसरात भव्य ध्वजस्तंभ उभारण्यात येणार असून, त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचीही यावेळी पाहणी करण्यात आली.

पंचगंगा नदी घाटाचा विकास करून नागरिकांना स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आकर्षक परिसर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न यामागे आहे. यावेळी महापौर, उपमहापौर, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका, प्रमुख पदाधिकारी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.


पंचगंगा घाटाचा होणार कायापालट; आ. राहुल आवाडेंकडून पाहणी!
Total Views: 15