विशेष बातम्या
पंचगंगा हॉस्पिटलला कायाकल्प पुरस्कार...
By Administrator - 6/18/2025 3:48:32 PM
Share This News:
पंचगंगा हॉस्पिटलला कायाकल्प पुरस्कार...
‘कायाकल्प’ यशासाठी २५ लाखांचा निधी; ऋतुराज क्षीरसागर यांची घोषणा
कोल्हापूरच्या पंचगंगा हॉस्पिटलला महाराष्ट्र शासनाच्या कायाकल्प योजना अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या यशाबद्दल शिवसेनेच्या वतीने युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते हॉस्पिटल प्रशासन व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीने हॉस्पिटलसाठी DPDCच्या माध्यमातून २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा ऋतुराज क्षीरसागर यांनी केली.
कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त महिलांकरिता डिंक लाडूंचे वाटप करण्यात आले.
पंचगंगा हॉस्पिटलला कायाकल्प पुरस्कार...
|