बातम्या

संततधार पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या दिशेने

Panchganga River in danger due to continuous rains


By nisha patil - 8/21/2025 1:09:25 PM
Share This News:



संततधार पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या दिशेने....

 सुतारवाडा परिसरातील कुटुंबाचे निवाराकेंद्रात स्थलांतर...

कोल्हापुर-:जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत असून ती धोका पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन महापालिकेची सर्व यंत्रणा अलर्ट ठेवण्यात आली आहे. चारही विभागीय कार्यालयांतील सर्व निवारा केंद्रे सज्ज ठेवली असून, पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.

काल सायंकाळी सुमारास सुतारवाडा परिसरात नदीचे पाणी नागरी वस्तीजवळ पोहोचले. यावेळी महापालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली.सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ पावले उचलत एका कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवले. हे कुटुंब चित्रदुर्ग मठ येथील महापालिकेच्या निवाराकेंद्रात स्थलांतरित करण्यात आले असून, त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

महापालिका व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


संततधार पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या दिशेने
Total Views: 82