बातम्या

पंचगंगेची पातळी ४१ फूट; शिरोळ तालुक्यातील तीन बंधारे पाण्याखाली

Panchganga water level at 41 feet


By Administrator - 6/7/2026 1:29:59 PM
Share This News:



पंचगंगेची पातळी ४१ फूट; शिरोळ तालुक्यातील तीन बंधारे पाण्याखाली

पंचगंगेच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस; कृष्णा नदी १४ फूटांवर, राजापूर बंधाऱ्यावरून 28 हजार,125 क्युसेकने कर्नाटकात विसर्ग

कुरुंदवाड  कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी शनिवारी ४१ फूटांवर पोहोचली असून, शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील दोन बंधारे आणि कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेले आहेत. 28,125  क्युसेक्सने कर्नाटक राज्यात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
     

पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात जलपर्णी येऊन तुंबली आहे. पाणीपातळी आणखी वाढल्यानंतर ही जलपर्णी प्रवाहाबरोबर वाहून जाण्याची शक्यता आहे.
   

कृष्णा नदीची पातळी १४ फूटांवर पोहोचली असून, कराड येथे १४ फूट ८ इंच, राजाराम बंधाऱ्यावर ११ फूट १० इंच, आयर्विन पुलाजवळ ६ फूट, ताकारी येथे ११ फूट २ इंच, बहे येथे ४ फूट, तर भीलवडी येथे ९ फूट पाणी नोंदविण्यात आले आहे. नदीच्या सर्वच ठिकाणी पाणीपातळीत वाढ होत असल्याने पाटबंधारे विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
    रणांमधील पाणीसाठाही वाढत आहे. कोयना धरणात १८.१९ टीएमसी, वारणा धरणात १२.५० टीएमसी, तर अलमट्टी धरणात २०.६८९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. वारणा धरणातून १०० क्युसेक, अलमट्टी धरणातून ८२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, कोयना धरणातून अद्याप विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.

तारा न्यूज प्रतिनिधी अजित बोडके


पंचगंगेची पातळी ४१ फूट; शिरोळ तालुक्यातील तीन बंधारे पाण्याखाली
Total Views: 22