बातम्या
पंचगंगातिरी अनंतकोटी ब्रह्मांडनायक स्वामींचा नामस्मरण सोहळा रविवारी
By Administrator - 1/30/2026 6:11:57 PM
Share This News:
पंचगंगातिरी अनंतकोटी ब्रह्मांडनायक स्वामींचा नामस्मरण सोहळा रविवारी
कोल्हापूर : प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्रीस्वामी सेवक मंडळ यांच्यावतीने श्रीस्वामी समर्थ नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे हे पहिले वर्ष असून, रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पंचगंगा नदी घाट परिसरात हा भक्तिमय कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातून मोठ्या संख्येने स्वामीभक्त सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. नामस्मरण सोहळ्यात दरवर्षी साधारणतः २००० हून अधिक लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत, पुरुष, माता-भगिनी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. हा सत्संग सर्वांसाठी मोफत खुला असून, सुमारे दोन ते अडीच तास चालणाऱ्या नामस्मरणातून परिसरात सकारात्मक आणि आनंदी भावतरंग निर्माण होतात.
सोहळ्याची सुरुवात पंचगंगा नदी घाट परिसरात स्वामींच्या मूर्तीचे पूजन व पंचगंगा नदीची आरती करून करण्यात येणार आहे. यानंतर भक्तिमय वातावरणात नामस्मरणाचा अखंड जप होणार आहे.
या नामस्मरण सोहळ्यास कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्वामीभक्तांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीस्वामी सेवक मंडळ व स्वामी सेवक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
ही माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला श्रीस्वामी सेवक मंडळाचे अरुण गवळी, गुरुदेव स्वामी आणि अमित पाटील उपस्थित होते.
पंचगंगातिरी अनंतकोटी ब्रह्मांडनायक स्वामींचा नामस्मरण सोहळा रविवारी
|