बातम्या
पंडित दीनदयाळ विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात साजरी*
By nisha patil - 5/7/2026 12:40:30 PM
Share This News:
**पंडित दीनदयाळ विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात साजरी*
**आजरा(हसन तकीलदार)* शनिवार दि. 4/7/2026 रोजी पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात पार पडली.
भारताचा राज्यकारभार संविधानानुसार चालतो .आणि आपल्या भारत देशात एक आदर्श आणि मजबूत लोकशाही आहे. आणि संपूर्ण जगाला आदर्शवत लोकशाही भारतात टिकून आहे. आणि ही लोकशाही टिकवून ठेवणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. संविधानानुसार दर पाच वर्षांनी भारतामध्ये सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात.त्यानुसार प्रतिनिधी निवडून देशाचा राज्यकारभार चालतो.त्याच पद्धतीने विद्यालयामध्येही विद्यार्थ्यांना ही मतदान प्रक्रिया समजण्यासाठी विद्यालयाने मंत्रिमंडळ निवडणूकीची प्रक्रिया घेतली.मोबाईलद्वारे मतदान घेण्यात आले. मतदान कक्षाचे उद्घाटन बशीर मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले.संस्थेचे खजानिस रमेश कारेकर, प्राचार्य संजीव देसाई यावेळी उपस्थित होते.
प्रत्यक्ष मतदान केंद्र तयार करून केंद्राध्यक्ष , अधिकारी,एआय च्या माध्यमातून मोबाईल द्वारे ईव्हीएम मशीनद्वारे विद्यार्थ्यांनी मतदान करून आपला मतदानाचा अधिकार बजावला. विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने यामध्ये सहभाग घेऊन शालेय मंत्रिमंडळ निवडून दिले.
मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्रिमंडळ यांची निवड करण्यात आली.मतदान कक्षाला संवेदना फाउंडेशनचे सचिव संतराम केसरकर, संजय हरेर यांनी सदिच्छा भेट दिली. तेजश्री बुरुड, विद्या कुंभार यांनी शिक्षकांच्या मदतीने या कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.
पंडित दीनदयाळ विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात साजरी*
|