विशेष बातम्या

Vitthal...Panduranga विठ्ठला..पांडुरंगा, महायुती सरकारला सुबुद्धी दे!

Panduranga


By nisha patil - 4/7/2025 5:43:43 PM
Share This News:



विठ्ठला..पांडुरंगा, महायुती सरकारला सुबुद्धी दे!

आ.सतेज पाटील ,माजी खा.राजू शेट्टींसह शेतकऱ्यांचे विठ्ठलाला साकडं

गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा. आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सुबुद्धी सरकारला यावी या मागणीसाठी आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी,  खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार सतेज पाटील यांनी  पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळ विठ्ठल मुर्तीला साकडे घातले. 

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शक्तिपीठ महामार्गातील बाधित 12 जिल्ह्यातील हजारो शेतकरी सामिल झाले.


Vitthal...Panduranga विठ्ठला..पांडुरंगा, महायुती सरकारला सुबुद्धी दे!
Total Views: 139