बातम्या
पन्हाळा नगरपरिषद तिसऱ्या दिवशीही एकही फॉर्म नाही.
By nisha patil - 11/13/2025 12:07:39 AM
Share This News:
पन्हाळा नगरपरिषद तिसऱ्या दिवशीही एकही फॉर्म नाही.
पन्हाळा प्रतिनिधी, शहाबाज मुजावर पन्हाळा नगरपरिषद 2025 सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी अर्ज दाखल झाला नाही. नगरपरिषद बिनविरोध करण्याचा नेत्यांचा डाव आहे. अशी चर्चा गावातून आहे, त्यामुळे गावातले सर्व नागरिक नाराज झाले आहेत . स्थानिक लोकांना विश्वासात घेत. नसल्यामध्ये लोकांच्या मनात खंत निर्माण झाले आहे. याचे पडसाद मताच्या रूपात दिसणार हे नक्की याबद्दल त्यांच्या मनात राग निर्माण झाला आहे .
सर्वच इच्छुक उमेदवारना शब्द दिला जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार मध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. फॉर्म भरण्याची सुरुवात दहा तारखेपासून झाली आहे.अजून तीन दिवस उलटून गेले. तरी एक ही फॉर्म दाखल झाला नसल्याची माहिती. निवडणूक निर्णय अधिकारी सौ. माधवी शिंदे-जाधव, यांनी माहिती दिली .
पन्हाळ्यातील जनसुराज्य या पक्षातील प्रमुख दोन गटांमध्ये अजून वाद मिटत नसल्यामुळे उमेदवारांच्या वर तांगटी तलवार आहे. तसेच गडावरील मोकाशी गट,भोसले गट,अजून तटस्तच्या भूमिकेत आहेत.भोसले गट हे सतीश भोसले यांच्या पत्नींना सौ,वेदांतिका भोसले नगराध्यक्षा चे उमेदवारी देणार आहेत. तर जनसुराज्य पक्षाकडून, रेखा विजय पाटील.रूपाली रवींद्र धडेल, रवींद्र तोरसे यांच्या घरात किंवा या तीन नेत्यांच्या कट्टर कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची बाबत चर्चा चालू आहे असे कळते.
मोकाशी गट हे अजून कुणाच्या बाजूने जाणार हे चित्र स्पष्ट झाले नाही आहे. सर्वच उमेदवार जनसुराज्य पक्षाकडून इच्छुक आहेत.त्यामुळे राजकीय वातावरण गरम असून उमेदवारांमध्ये थंड होण्याची परिस्थिती झाली आहे.
उद्या शुभ मुहूर्त गुरुवार असल्यामुळे एखांदा अर्ज दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक बँकेत निवडणूकसाठी लागणारे नवीन खाते सेविंग खाते 75 ते 80 च्या आसपास काढण्यात आली आहेत. रोज तीन नंतर वारणा येथे आमदार विनय रावजी कोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गटातटांचे नेत्यांची मिटींग सुरू आहेत.
इच्छुक उमेदवारांची वारणाची वारी करत आहेत.एकंदरीत सर्वच वातावरण नगरपरिषद बिनविरोध करण्याचे आहे.अशी चर्चा संपूर्ण गावात आहे. तसेच सध्या तरी असे वाटते की जर निवडणूक लागलीच तर जनसुराज्य विरोध भोसले गट अशी लढत होईल. पन्हाळातील राजकारण हे नगराध्यक्ष उमेदवाराच्या चेहऱ्यावर राजकारण असणार आहे.
पन्हाळा नगरपरिषद तिसऱ्या दिवशीही एकही फॉर्म नाही.
|