बातम्या

पन्हाळा निवडणूक 2025 : महायुतीची भव्य रॅली, जयश्री पवारांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद

Panhala Election 2025


By nisha patil - 11/29/2025 4:35:46 PM
Share This News:



पन्हाळा निवडणूक 2025 : महायुतीची भव्य रॅली, जयश्री पवारांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद

पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भाजप, जनसुराज्य शक्ती पार्टी आणि संयुक्त आघाडी महायुतीतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मा. जयश्री प्रकाश पवार (तोरसे) तसेच सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीदरम्यान उमेदवारांनी विविध मान्यवरांच्या घरी भेट देऊन संवाद साधला आणि आगामी निवडणुकीतील महायुतीच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला.

पन्हाळा किल्ल्याची युनेस्कोद्वारे जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झाल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी महायुतीचे उमेदवार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या निवडणुकीत महायुतीचे ६ नगरसेवक बिनविरोध विजयी झाले असून, उर्वरित उमेदवारही मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी तालुका अध्यक्ष मा. अमरसिंह भोसले, प्रदेश सचिव मा. डॉ. स्वाती पाटील, प्रदेश सदस्य मा. डॉ. अजय चौगुले, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मा. प्रशांत बुगले, कोडोली अध्यक्ष मा. ओंकार कणसे, शहर अध्यक्ष मा. मनोज नाखरे, जिल्हा उपाध्यक्ष मा. माधवी भोसले यांच्यासह अनेक मान्यवर व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पन्हाळ्यात महायुतीची घोडदौड अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.



पन्हाळा निवडणूक 2025 : महायुतीची भव्य रॅली, जयश्री पवारांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद
Total Views: 39