बातम्या

पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेचे आज सर्वच प्रभागाचे आरक्षण जाहीर

Panhala Giristhan Municipal Council announces reservation for all wards today


By nisha patil - 8/10/2025 6:15:21 PM
Share This News:



पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेचे आज सर्वच प्रभागाचे  आरक्षण जाहीर 

पन्हाळा प्रतिनिधी, शहाबाज मुजावर.गडावरील नगरपरिषदेचे एकूण 10 वार्डमध्ये 20 उमेदवाराचे आरक्षण आज दिनांक, 8 ऑक्टोंबर 2025 रोजी, सकाळी 11:30 जाहीर झाले. दिनांक 06 ऑक्टोंबर 2025 रोजी, मंत्रालय या ठिकाणी पन्हाळा नगराध्यक्षाचे आरक्षण सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाले.
 

हे प्रभागाचे आरक्षण पूर्वी 28 नोव्हेंबर 2022 रोजी, जाहीर झाले होते. तशाच पद्धतीचे साधारण हे आरक्षण दर्शवते. त्यावेळी निवडणूक झाली नव्हती. आता ही चार वर्षांनी निवडणूक येत आहे. सर्वच उमेदवार प्रतीक्षेत मध्ये होते. आज दुपारनंतर सर्व राजकारणाच्या गडावरच्या गटतटाच्या राजकीय बांधण्या सुरू झाले आहेत. 
             

आज सांस्कृतिक हॉल पन्हाळा बसस्थानक या ठिकाणी नगरपरिषद चे मुख्याधिकारी, चेतनकुमार माळी, उपजिल्हाधिकारी कोल्हापूर, महसूल डॉ. संपत खिल्लारी, यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरक्षण पन्हाळगडावरील कन्या विद्या मंदिर पन्हाळा येथील, इनाया अल्ताफ आगा,सोनाली किसन काळे,आराध्य आशिष लाड.,माहिरा अल्ताफ आगा. या शाळेच्या चिमुकले विद्यार्थिनी च्या हस्ते  चिट्ट्या काढण्यात आल्या. आरक्षण जाहीर करण्यात आले.नगरपरिषद हद्दीतील सर्वच गटातील नेते,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होतेत.  दुर्दैवाची बाब म्हणजे यावर्षी नगरपरिषद वर सर्वात जास्त 11 महिला या नगरपरिषद वर निवडून जाणार आहेत. एक ही महिला आरक्षण दरम्यान यावेळी उपस्थित नव्हती.  
             

यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी, विश्वास रामाने, नंदकुमार कांबळे, सुहास भोसले ,जेवंत कांबळे,इत्यादी उपस्थित होते. पन्हाळगड आरक्षण खालील प्रमाणे पडले आहे.

प्रभाग 1,अ)अनुसूचित जाती महिला, ब)सर्वसाधारण, प्रभाग 2, अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ब) सर्वसाधारण, प्रभाग 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग.ब) सर्वसाधारण (महिला),प्रभाग 4.अ)सर्वसाधारण ब) सर्वसाधारण (महिला). प्रभाग 5, अ) सर्वसाधारण महिला ब)सर्वसाधारण.प्रभाग 6, अ)अनुसूचित जाती. ब) सर्वसाधारण महिला प्रभाग 7. अ)अनुसूचित जाती महिला, ब)सर्वसाधारण.
प्रभाग 8. अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग.ब) सर्वसाधारण महिला.
प्रभाग 9.अ)सर्वसाधारण महिला,ब) सर्वसाधारण
प्रभाग 10.अ)नागरिकांचा मागासवर्ग महिला .ब) सर्वसाधारण.


पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेचे आज सर्वच प्रभागाचे आरक्षण जाहीर
Total Views: 86