राजकीय
पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेचे निकाल दोन फेऱ्यात,
By nisha patil - 12/21/2025 1:33:59 PM
Share This News:
पन्हाळा प्रतिनिधी, शहाबाज मुजावर
पन्हाळा नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्र१)२६१ पैकी २१३, प्रभाग क्र२)२९६ पैकी २३७, प्रभाग क्र, ३)२९६ पैकी २११, प्रभाग क्र.४) ३२६ पैकी २७१, प्रभाग क्र५)२४६ पैकी २१४, प्रभाग,क्र,६)२८८ पैकी २५१, प्रभाग क्र,७)२८८ पैकी २३३, प्रभाग क्र, ८)२९६ पैकी २६८, प्रभाग क्र,९)३४० पैकी३०१,प्रभाग क्र १०)३७० पैकी ३१३ अशा प्रकारे एकूण दहा प्रभागांमध्ये २९६७ पैकी २५१२ मतदान झाले.अतिशय चुरशीने मतदान प्रक्रिया शांततेत ०२/१२/२०२५ पार पडले.८५ टक्के मतदान झाले. मतमोजणी रविवार, दि. २१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून होणार असून, ते दोन फेऱ्यांत पार पडणार आहे. पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक, एक ते पाच तर दुसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक पाच ते दहा अशा पद्धतीने मतमोजणी पाच टेबलवर होणार आहे. पन्हाळ्यातील बस स्थानक मयूरबाग येथील नगरपरिषदेच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. १२:३० ते ०१:३० वा पर्यंत सर्व निकाल लागतील.
पन्हाळा नगरपरिषदेसाठी २० नगरसेवक तर थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यात येणार होते.नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होते, दोन उमेदवारांत सरळ चुरस आहे. नगरसेवकपदासाठी २० पैकी ०६ ठिकाणी बिनविरोध निवड झाली.उर्वरित १४ प्रभागांत ३२ उमेदवार रिंगणात उतरले होते. मतमोजणीसाठी एकूण पाच टेबलची व्यवस्था केली आहे. मतमोजणी प्रक्रिये दरम्यान उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
तसेच माध्यम प्रतिनिधीचे अधिकृत प्रतिनिधी असणार आहेत. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी माधवी शिंदे- जाधव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, चेतनकुमार माळी यांनी आज पन्हाळा नगरपरिषद हॉलमध्ये मतमोजणी इतर माहिती दिली. या निवडणूक साठी नगराध्यक्ष जनसुराज्य चा होणार काय ? अपक्ष होणार ? तर किती नगरसेवक अपक्ष येणार ? याचीच चर्चा गडावर आहे.
पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेचे निकाल दोन फेऱ्यात,
|