खेळ

पन्हाळा नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्या हस्ते सावकर चषक २०२६ चे उद्घाटन,

Panhala Mayor Jayashree Pawar inaugurated the Savkar Cup 2026


By nisha patil - 2/13/2026 11:48:38 AM
Share This News:



पन्हाळा नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्या हस्ते सावकर चषक २०२६ चे उद्घाटन,

पन्हाळा प्रतिनिधी,शहाबाज मुजावर 
      
 आज दिनांक गुरूवार दिनांक.१२/०२/२०१६ रोजी दुपारी . १२:००वा,भव्य टेनिस बॉल ओपन क्रिकेट स्पर्धा, सावकर चषक २०२६ खोकड तलाव, येथे पन्हाळा नगराध्यक्षा जयश्री प्रकाश पवार यांच्या हस्ते सावकर चषक २०२६ चे उद्घाटन  झाले. ही स्पर्धा गेले नऊ वर्ष घेतली जाते. हे स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. ही स्पर्धा शिवछत्रपती पुरस्कार विजेते कै. श्री. दिलीप जोशी सर यांचे स्मरणार्थ  भरवली जाते.
 या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १,११,१११/-मा. श्री. रविंद्र धडेल साहेब व मा. श्री. सतिश कमलाकर भोसले यांच्याकडून , द्वितीय क्रमांक ७०,७७७/-(साई सिध्दी कन्स्ट्रक्शन) मा. श्री, सचिन पाटील तसेच तृतीय क्रमांक ३०,३३३/-मंगलमुर्ती कन्स्ट्रक्शन यांच्याकडून देण्यात येणार आहे.जे संघ उपांत्य फेरीत २ पराभुत होतील, त्या संघांना विभागून दिले जाणार आहे. तसेच  मालिकावीर म्हणून खेळाडूला इलेक्ट्रीक बाईक मा. श्री. कैलाश शहा  (किंग कम्प्युटर कोल्हापूर) यांच्याकडून देण्यात येणार आहे. सायकल उत्कृष्ट फलंदाज,व उत्कृष्ट गोलंदाज, यांना देण्यात येणार आहे. पन्हाळा क्रिकेट क्लब यांच्या वतीने हा चषक  घेण्यात येतो. 
 प्रत्येक वेळी अनेक भारतातील टेनिस बॉल क्रिकेटचे मोठे खेळाडू येत असतात. यावर्षी 
(I S P L) ही महाराष्ट्रातील  देवगड येथील आनंदवाडी नंतर मान्यता  असणारी सावकार चषक महाराष्ट्रातील दुसरे स्पर्धा आयोजक आहेत. त्यामुळे या स्पर्धेसाठी अनेक दिग्गज खेळाडू भाग घेतील. या स्पर्धेसाठी १६ संघाने  भाग घेतला आहे, महाराष्ट्रातील नामवंत संघ तसेच कर्नाटक परिसरातील अनेक खेळाडू व संघ या स्पर्धेसाठी साठी आले आहेत.रोज पाच सामने होतील. शेवटच्या दिवसी दिवसरात्र असे सामना होणार आहेत,
 या सामन्यासाठी भारतातील टेनिस बॉल क्रिकेटचे अनेक नामवंत खेळाडू 
प्रसन्न पाटील, अमित नाईक, भूषण गोळे, योगेश पेनकर , शिरू लोहार, अमित तांबे, रोहन खरात, कृष्णा गवळी,विजय पावले, गंगाधर इंगवले, नितीन माटुंगे, विश्वनाथ जाधव, कृष्णा सातपुते, बबलू पाटील, इजाज कुरेशी, वासिक शेख, जयेश पाटील, रजत मुंडे, अमित नाईक हे येणार आहेत.
 या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,चेतनकुमार माळी,  माजी उपनगराध्यक्ष, सतीश भोसले,माजी उपनगराध्यक्ष, रवींद्र धडेल, जमीर  गारर्दी नगरसेवक, रामानंद गोसावी, नगरसेविका प्रतीक्षा वराळे , शिवसेना पन्हाळा अध्यक्ष मारुती माने, समशेर फरास , पन्हाळा क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य व  मान्यवर उपस्थित होते.


पन्हाळा नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्या हस्ते सावकर चषक २०२६ चे उद्घाटन,
Total Views: 210