राजकीय

📰 पन्हाळा नगरपरिषद आरक्षण सोडत जाहीर; लहान मुलींच्या हस्ते पार पडला सोहळा

Panhala Municipal Council


By nisha patil - 8/10/2025 1:56:00 PM
Share This News:



पन्हाळा:-  पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आज (दि. ८ ऑक्टोबर) पन्हाळा बसस्थानक येथील सांस्कृतिक हॉलमध्ये पार पडली. या सोडतीचा कार्यक्रम कन्या विद्यामंदिर, पन्हाळा येथील चार लहान विद्यार्थिनींच्या हस्ते संपन्न झाला. इनाया अल्ताफ आगा, सोनाली किसन काळे, आराध्या आशिष लाड आणि माहिरा अल्ताफ आगा या चार मुलींनी सोडत काढून निवडणुकीतील आरक्षण निश्चित केले.

या प्रसंगी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थितांनी या लहान मुलींच्या सहभागाचे विशेष कौतुक केले.

२०२५ मधील ही आरक्षण सोडत २०२२ मध्ये जाहीर आरक्षण सारखीच साधारण रचना दर्शवते. अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग , तसेच सर्वसाधारण आणि महिला प्रवर्ग अशा विविध गटांनुसार प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

या सोडतीनंतर पन्हाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून, राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे.


📰 पन्हाळा नगरपरिषद आरक्षण सोडत जाहीर; लहान मुलींच्या हस्ते पार पडला सोहळा
Total Views: 56