राजकीय
पन्हाळा नगरपरिषद निवडणूक : सहा उमेदवार बिनविरोध निवड
By nisha patil - 11/21/2025 5:05:14 PM
Share This News:
पन्हाळा नगरपरिषद निवडणूक : सहा उमेदवार बिनविरोध निवड
पन्हाळा नगरपरिषद निवडणुकीत एकूण सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, स्थानिक राजकारणात यामुळे वेगळीच चर्चा रंगली आहे. शिव शाहू आघाडीकडून सतीश भोसले आणि प्रियांका गवळी, तर जनसुराज्य शक्तीकडून प्रतीक्षा वराळे, रामानंद गोसावी आणि सखाराम काशीद हे उमेदवार निर्विरोध निवडले गेले आहेत.
दरम्यान, शाहू महाआघाडी किल्ले पन्हाळाकडून असिफ मोकाशी यांचीही बिनविरोध निवड झाली असून, विविध पॅनेलमधील उमेदवार विनासंघर्ष निवडून आल्याने नगरपरिषदेत आगळीच समीकरणे तयार होत आहेत.
स्थानीय राजकारणातील या घडामोडींना आगामी सत्ता स्थापनेत विशेष महत्त्व प्राप्त होणार असल्याचे बोलले जात आहे.
पन्हाळा नगरपरिषद निवडणूक : सहा उमेदवार बिनविरोध निवड
|