बातम्या

परराज्यातील घरफोड्या उघडकीस; पन्हाळा गुन्हे शोध पथकाचा १.९४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Panhala crime news


By nisha patil - 8/12/2025 6:13:55 PM
Share This News:



परराज्यातील घरफोड्या उघडकीस; पन्हाळा गुन्हे शोध पथकाचा १.९४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पन्हाळा – दि. ०८ डिसेंबर २०२५ पन्हाळा पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने परराज्यातील घरफोडी आणि मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. या आरोपीकडून एकूण ३ गुन्हे उघडकीस आणण्यात येत १,९४,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

पन्हाळा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा र.नं. २०७/२०२५ भा.दं.सं. २०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये तपास सुरू होता. तपासादरम्यान सहा. फौजदार समीर मुल्ला व पोहवा संतोष वायदंडे यांनी परिसरातील ३० ते ४० सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीद्वारे आरोपीचा माग काढला.

 

अटक आरोपी :

 

आनंद सोमाप्पा सुटकन्नावर (वय २८), रा. अर्जुनवाडा रोड, हुक्केरी, जि. बेळगाव (कर्नाटक)

 

फिर्यादी नितीन माने (रा. निकमवाडी) यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. तसेच निकमवाडीतीलच मालुबाई आनंदा खोत यांच्या घराचे कुलूप तोडून दीड तोळा सोन्याची माळ चोरली असल्याचा तपासात उलगडा झाला.

 

तपास पथकाने मिळवलेल्या माहितीआधारे आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून पन्हाळा पोलीस ठाण्यातील २ आणि शाहुवाडी पोलीस ठाण्यातील १ असा एकूण ३ गुन्हे उघडकीस आले. आरोपीकडून सोन्याचे दागिने व मोटारसायकल असा १.९४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाईत सहभागी अधिकारी :

 

मा. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता,

मा. अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार,

उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली

सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर,

पो.उ.नि. सलीम सनदी,

सहा. फौजदार समीर मुल्ला,

पो.हवा संतोष वायदंडे,

पो.ना तौसिफ मुल्ला

यांनी ही कौतुकास्पद कारवाई केली.


परराज्यातील घरफोड्या उघडकीस; पन्हाळा गुन्हे शोध पथकाचा १.९४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Total Views: 192