बातम्या

पन्हाळ्याच्या ऐतिहासिक भूमीवर रंगला फुटबॉलचा थरार; पन्हाळा फुटबॉल क्लबचे यशस्वी आयोजन

Panhala football


By nisha patil - 4/14/2026 11:31:54 AM
Share This News:



पन्हाळ्याच्या ऐतिहासिक भूमीवर रंगला फुटबॉलचा थरार; पन्हाळा फुटबॉल क्लबचे यशस्वी आयोजन

पन्हाळा: येथील पन्हाळा फुटबॉल क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य फुटबॉल स्पर्धेचा दुसऱ्या सत्राचा थरार नुकताच पार पडला. ऐतिहासिक पन्हाळगडाच्या साक्षीने झालेल्या या सामन्यांनी क्रीडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामांकित संघांनी सहभाग नोंदवला होता.अंतिम सामना Elight FC आणि शिवप्रेमी FC अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट कौशल्य आणि चपळता दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. पन्हाळा फुटबॉल क्लबच्या उत्कृष्ट नियोजनामुळे ही स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडली.

विजेत्या संघांना आकर्षक चषक आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्थानिक नागरिकांनी आणि क्रीडा रसिकांनी या सामन्यांना मोठी गर्दी केली होती. "युवकांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि स्थानिक गुणवत्तेला वाव मिळावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले होते," असे आयोजकांनी सांगितले.

 सदर स्पर्धेला भाजपचे पन्हाळा तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले तसेच  रविंद्र तोरसे, अमितकुमार दळवी, संतोष काशीद, अनुप गवंडी मान्यवरांचे सहकार्य लाभले


पन्हाळ्याच्या ऐतिहासिक भूमीवर रंगला फुटबॉलचा थरार; पन्हाळा फुटबॉल क्लबचे यशस्वी आयोजन
Total Views: 29