राजकीय

पन्हाळा. नगरपरिषद,नामनिर्देशक फॉर्म दाखल

Panhala nagarparishad


By nisha patil - 11/17/2025 9:11:07 PM
Share This News:



 पन्हाळा. नगरपरिषद,नामनिर्देशक फॉर्म दाखल.

८१ अर्ज सदस्य पदासाठी तर नगराध्यक्ष पदासाठी ०६ अर्ज

पन्हाळा प्रतिनिधी, शहाबाज मुजावर   नगराध्यक्ष पदासाठी गडावर जनसुराज्य पक्षाचा एबी फॉर्म, जयश्री प्रकाश पवार यांना, त्या रघुनाथ तोरसे काका यांच्या कन्या होत, त्यांचे भाऊ ॲड रवींद्र तोरसे हे सामाजिक काम करत असल्यामुळे पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिला आहे.

तसेच त्यांच्या घरात सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी जपला आहे म्हणून त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिला आहे असे जनसुराज्य पक्षाचे सचिव ॲड राजेंद्र पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले .

आता अपक्षाच्या भूमी कडे सर्वांची लक्ष गडावर आहे. उद्या अकरा वाजता छाननी होणार आहे.माघारीचा २१/११/२०२५रोजी तीन वाजेपर्यंत वेळ आहे. माघारी नंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. तीन गटांना एकत्र करत नगराध्यक्ष आपल्याकडे ठेवत दोन गटांबरोबर तोडजोड करून बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा अपक्षांनी नामनिर्देशक फॉर्म अपेक्षेपेक्षा जास्त भरल्यामुळे आता बिनविरोध होणे धुसर झाले आहे.

पण नगराध्यक्ष पदासाठी फक्त सहा त्यामध्ये जनसुराज्यचे तीन व इतर मध्ये तीन असल्यामुळे त्यामध्ये नगराध्यक्ष बिनविरोध होण्याचे शक्यता नाकारता येणार नाही हे चित्र २१ नंतरच स्पष्ट होईल.


पन्हाळा. नगरपरिषद,नामनिर्देशक फॉर्म दाखल
Total Views: 223