बातम्या
पन्हाळा नगरपरिषद उपनगराध्यक्ष,स्वीकृत सदस्यांची निवड १२ जानेवारीला
By nisha patil - 9/1/2026 8:51:26 PM
Share This News:
पन्हाळा नगरपरिषद उपनगराध्यक्ष,स्वीकृत सदस्यांची निवड १२ जानेवारीला,
पन्हाळा प्रतिनिधी,शहानवाज मुजावर पन्हाळा नगरपरिषद पहिली सर्वसाधारण सभा मध्ये उपनगराध्यक्ष तसेच दोन स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे.याकरिता पन्हाळा नगरपरिषदेतून शिव-शाहू आघाडी कडून अशोक भोसले ,शाहू आघाडीकडून शौकत मुजावर तर भाजप कडून इंद्रायणी आडनाईक व अमर भोसले या चार जणांचे अर्ज विक्री झाले आहेत. दिनांक १२ जानेवारी रोजी २४ तास अगोदर फॉर्म भरण्याची मुदत आहे.
अशी माहिती मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी चेतनकुमार माळी यांनी माहिती दिली आहे.
नगरपरिषदेचा २१ डिसेंबर २०२५ रोजी निकाल लागला, निवडणूक पूर्वी जनसुराज्य, भाजप व स्थानिक आघाड्यांनी पन्हाळा पालिका निवडणूक एकत्र लढवली. मात्र, प्री-पोल संयुक्त आघाडी नोंदणी नसल्याने सर्वच आघाड्यांच्या पक्षाचे प्रतोद स्वतंत्र निवडले गेले आहेत. यामध्ये जनसुराज्य या पक्षाचे नगराध्यक्ष सह नऊ उमेदवार निवडून आलेत.तर एक अपक्ष उमेदवारांनी जनसुराज्याला पाठिंबा दिला आहे. जनसुराज्य पक्ष प्रतोद म्हणून सौ. प्रतीक्षा योगेश वराळे यांची निवड करण्यात आली आहे.
शिव-शाहु आघाडी यांनी आपला पक्ष प्रतोद म्हणून सतीश भोसले यांची निवड केली, तर तीन अपक्षांनी शिवशाही आघाडी यांना पाठिंबा दिला आहे. शाहु आघाडी यांनी आपला पक्षप्रतोद म्हणून असिफ मोकाशी यांची निवड केली आहे. तर भाजप पक्षाच्यावतीने अँड. मिलिंद कुराडे यांची पक्षप्रतोद म्हणून निवड करण्यात आले आहेत.
नगरपरिषदेच्या निवडणूक पूर्वी जनसुराज्य, भाजप व स्थानिक आघाड्यांनी पन्हाळा पालिका निवडणूक एकत्र लढवली त्यावेळी शिवशाही आघाडी यांना एक स्वीकृत नगरसेवक तर भाजप यांना एक स्वीकृत नगरसेवक पद देण्याचे ठरले आहे, तर उपनगराध्यक्षपदी शिवशाहू आघाडी यांना देण्याचे ठरले आहे.
अशी राजकीय चर्चा पन्हाळागडावर आहे. पन्हाळवासियांचे लक्ष आता वारणेवर आहे. वारणा येथून कोणाचे नावाचा आदेश येतो. याची वाट सर्व लोक पाहत आहेत.दोन स्वीकृत नगरसेवक उपनगराध्यक्ष या तीन महत्त्वपूर्ण नगरपरिषदेच्या पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे पन्हाळ्याचे १२ जानेवारी सभेकडे लक्ष लागले आहे.
पन्हाळा नगरपरिषद उपनगराध्यक्ष,स्वीकृत सदस्यांची निवड १२ जानेवारीला
|