राजकीय

पन्हाळा नगरपरिषद विशेष समितीची निवड जाहीर 

Panhala nagarparishad samiti


By nisha patil - 1/20/2026 11:29:49 PM
Share This News:



पन्हाळा नगरपरिषद विशेष समितीची निवड जाहीर 

पन्हाळा प्रतिनिधी,शहानवाज मुजावर पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदावर जयश्री प्रकाश पवार यांची निवड झाली होती. त्यानंतर नगरपरिषदेत सत्ता संतुलन राखत व सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याच्या भूमिकेतून विविध विषय समित्यांची रचना करण्यात आली आहे.

या निवड कडे सर्व गावाचे लक्ष लागले होते. नगरपरिषदेतील सत्तास्थापनेनंतर विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी विषय समित्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याच पार्श्वभूमीवर अनुभवी नगरसेवकांसह नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना संधी देत समित्यांची निवड करण्यात आली आहे.

 स्थायी समिती,सभापतिपद श्रीमती जयश्री प्रकाश पोवार नगराध्यक्षा,यांच्याकडे तर उपसभापती. सतीश कमलाकर भोसले,याच्याकडे तर सदस्यपदी.अभिजित दिपक गायकवाड,तेजस्विनी संजय गुरव,

 स्वच्छता व वैद्यकीयदृष्ट्या आरोग्य समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष, सतीश कमलाकर भोसले यांची निवड करून शहरातील स्वच्छता, आरोग्य आणि सार्वजनिक सेवांवर थेट नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सत्ताधारी गटाने अनुभवी नेतृत्वाकडे सोपवली आहे. या समितीमध्ये श्री. लक्ष्मण नारायण कांबळे,सखाराम शामराव काशिद, प्रदिप प्रभाकर गवळी या समितीत सदस्य म्हणून निवड करण्यात आले आहेत. तसेच यांच्या बरोबरीने विविध प्रभागांचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक सहभागी होतील.

 सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी अभिजित दीपक गायकवाड यांची निवड करण्यात आली, तसेच या समितीचे सदस्य म्हणून ,संध्या जितेंद्र पोवार,शबाना तौफिक मुल्ला,महेश धोंडीराम भाडेकर हे सदस्य आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि विकासकामांच्या माध्यमातून आगामी काळात सत्ताधारी गटाची कामगिरी थेट जनतेसमोर येणार आहे. त्यामुळे या समितीचे कामकाज राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.

 महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मा. सौ. तेजस्विनी संजय गुरव यांची निवड करण्यात आली.तर उपसभापती दिपाली संतोष काशीद यांची निवड करण्यात आली तर सदस्य पदी,प्रगती अनुप गवंडी,व श्रीमती रशिदा मन्सुर मुजावर, 

 स्थायी समितीत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व प्रमुख समिती सभापतींचा समावेश करून निर्णय प्रक्रियेवर सत्ताधारी गटाची पकड मजबूत ठेवण्यात आली आहे. आर्थिक निर्णय, अंदाजपत्रक व धोरणात्मक बाबींमध्ये स्थायी समिती महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

  दरम्यान, विषय समित्यांच्या रचनेत समतोल राखण्यात आल्याचा दावा सत्ताधारी गटाकडून करण्यात येत असून, सर्व नगरसेवकांकडून अंमलबजावणीवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. समित्यांच्या कामगिरीवरच नगरपरिषदेतील पुढील राजकीय समीकरणे ठरणार असल्याची चर्चा पन्हाळा शहरात सुरू आहे.


पन्हाळा नगरपरिषद विशेष समितीची निवड जाहीर 
Total Views: 32