विशेष बातम्या
पन्हाळ्याचा स्वच्छतेत राष्ट्रपातळीवर गौरव
By nisha patil - 7/17/2025 7:17:31 PM
Share This News:
पन्हाळ्याचा स्वच्छतेत राष्ट्रपातळीवर गौरव
पन्हाळा नगरपरिषदेचा देशपातळीवर सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मधील ‘सुपर स्वच्छ लीग’ श्रेणीत पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेला राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला. 17 जुलै रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे मा. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्याधिकारी चेतनकुमार माळी आणि अभियंता प्रिया तारळेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. सलग सहा वर्षे ODF++ मानांकनासह पन्हाळ्याने 85% पेक्षा अधिक गुण मिळवत देशपातळीवर आपले स्थान भक्कम केले आहे. शहराच्या स्वच्छतेतील योगदानामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पन्हाळ्याचा स्वच्छतेत राष्ट्रपातळीवर गौरव
|