खेळ

गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पन्हाळ्याचा झेंडा

Panhalas flag flies high at the international karate competition held in Goa


By nisha patil - 4/2/2026 12:40:22 PM
Share This News:



गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पन्हाळ्याचा झेंडा


पन्हाळा प्रतिनिधी (शहाबाज मुजावर) :- शोतोकन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित दहावी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा १ फेब्रुवारी २०२६ रोजी पेडम स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, म्हापसा (गोवा) येथे  उत्साहात पार पडली.या स्पर्धेत विविध देशांतील विविध राज्यांतून खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या  आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पन्हाळा येथील सर्व विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन केले आहे. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी
१) समरजीत राजेंद्र दळवी २) आराध्या काशीद

तर रौप्य पदक प्राप्त केलेले विद्यार्थी 1) जानवी मिंचेकर 2) सानवी कुऱ्हाडे 3) मन्नत आगा
 या सर्व विद्यार्थ्यांनी पन्हाळा कराटे क्लास इथे प्रशिक्षण घेतले.अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यासाठी SKAI चे अध्यक्ष रमेश पिसाळ सचिव सौ सुषमा पिसाळ , प्रशिक्षक निलेश पवार  व चैतन्य कांबळे तसेच सर्व संस्थेतील शिक्षक स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील पदक प्राप्त विद्यार्थ्यांची निवड नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंडो नेपाळ स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांचे गावातून कौतुक होत आहे.


गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पन्हाळ्याचा झेंडा
Total Views: 123