ताज्या बातम्या

शैक्षणिक सहलींमुळे पन्हाळगड हाउसफुल आत्तापर्यंत ४५० सहलींनी गडाला दिली भेट,

Panhalgad Housefull due to educational trips


By nisha patil - 11/12/2025 12:02:37 PM
Share This News:



पन्हाळा प्रतिनिधी,  शहाबाज मुजावर
           राज्यभरातील तसेच कर्नाटक या राज्यातील शाळा,महाविद्यालयांकडून  शैक्षणिक सहलींच्या ओढा हा यावर्षीच्या सहलीच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच पन्हाळगडाला पहिली पसंती दिली आहे. ४५० च्या आसपास सहली पन्हाळगडावर या गेल्या महिन्यापासून आल्या आहेत.
         पन्हाळगडाला भेट देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात जास्त म्हणजे १३२ दिवस सलग महाराजांचे वास्तव्य गडावर होते ज्यावेळी सिद्धी जोहरच्या वेढ्या पडला होता. तसेच छत्रपती संभाजी राजांचे वास्तव्य याच गडावर होते. त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी विद्यार्थी वर्गामध्ये उत्सुकता पाहाव्यास मिळत आहे.
         पन्हाळगडावरील गाईड लोकांचा चांगला व्यवसाय होत आहे. सहलींचा हंगाम आसल्यामुळे गाईड अनेकदा सहलींना मिळत नाही. तसेच पार्किंगची व्यवस्था
कोंलमंडली आहे. कारण क्षमतेपेक्षा जास्त सहलीच्या मोठ्या गाड्या येत आहेत. तसेच झुणका-भाकर केंद्र हाउसफुल झालेले पहावयास मिळत आहेत. छोटे-मोठे व्यवसायिक सहलीच्या हंगामामुळे व्यवसायात तेजी आल्यामुळे  गडावरील व्यवसायिक खुश झाले आहेत. गडावरील अंधारबाव,तीन दरवाजा परिसर, अंबरखाना,दुतोंडी बुरुज सज्जाकोटी,राजदिंडी,नेहरू गार्डन,तबक डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आशा महत्त्वाच्या ठिकाणी सहलीची हाउसफुल गर्दी गडावर पहावयास मिळत आहे.
            पन्हाळगडाचा रणसंग्राम हा लघुपट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. पन्हाळगडचा रणसंग्राम १३ डी थिएटर विद्यार्थ्यांचे आकर्षण बनत आहे. इतिहासाबरोबरच थंड हवेचे ठिकाण म्हणून  पन्हाळग प्रसिद्ध आहे. 
        पन्हाळगडाचा इतिहास स्थानिक गाईड कडून जाणून घेताना विद्यार्थी भारावून जात आहेत.राज्यभरातून सहलींसाठी विद्यार्थी पन्हाळगडावर येत आहेत. त्यांच्यासाठी प्रशासनाने पार्किंग, स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.पन्हाळा गडाचा रणसंग्राम या चित्रपट साठी प्रति विद्यार्थी १०० रुपये इतक्या सवलतीच्या दरात पन्हाळगडचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. तसेच नगरपरिषदेचा प्रवासी कर एका व्यक्तीला पंधरा रुपये तिकीट आहे.ते  विद्यार्थी सहलींना अडीच रुपये विद्यार्थ्यांना सूट देऊन प्रवासी कर  घेतला जातो. प्रवासी कर घेताना नगरपरिषदेचे कामगारांची कमतरता भासत आहे. नगरपरिषद कडून प्रवासी करात रनसंग्रामाच्या तिकिटात मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे.


शैक्षणिक सहलींमुळे पन्हाळगड हाउसफुल आत्तापर्यंत ४५० सहलींनी गडाला दिली भेट,
Total Views: 108