बातम्या

पँथर आर्मी तर्फे समतावादी भारत राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

Panther Army awards Samatavadi Bharat Rashtra Gaurav Award


By nisha patil - 4/15/2025 4:06:34 PM
Share This News:



पँथर आर्मी तर्फे समतावादी भारत राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३४ मान्यवरांचा सन्मान

इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनी सभागृहात पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेतर्फे समतावादी भारत राष्ट्र गौरव पुरस्कार  सोहळा दिमाखात पार पडला. आ. डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 134 व्यक्ती व संस्थांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पँथर आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस. आठवले होते. समाजवादी विचारवंत प्रसाद कुलकर्णी यांनी समतावादी भारत व सामाजिक समरसता  या विषयावर व्याख्यान घेतले. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. 

प्राचार्य साताप्पा कांबळे, ॲड. डॉ. तुषाल शिवशरण, सरपंच शकिला कुन्नूर, स्नेहल कांबळे, अभयकुमार काश्मिरे यांच्यासह 122 चळवळीतील कार्यकर्त्यांना कोल्हापुरी फेटा, शाल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत मच्छिंद्र रुईकर यांनी तर आभार अमोल कुरणे यांनी मानले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


पँथर आर्मी तर्फे समतावादी भारत राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न
Total Views: 209