बातम्या

पेपरफुटी करणाऱ्यांचे धाबे दणाणणार! १० कोटींचा दंड, १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिफारस!

Paper leakers will be punished


By nisha patil - 11/24/2026 6:25:31 PM
Share This News:



पेपरफुटी करणाऱ्यांचे धाबे दणाणणार! १० कोटींचा दंड, १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिफारस!

राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील पेपरफुटीला लगाम घालण्यासाठी सरकार आता कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे.
 

पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकार करणाऱ्यांना ७ ते १० वर्षांपर्यंत कारावास आणि किमान १० कोटींच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे. गैरप्रकारात सहभागींची मालमत्ता जप्त करण्यासह परीक्षा घेणाऱ्या संस्थांवरही कठोर कारवाईचा प्रस्ताव आहे.विशेष तपास पथक (STF), विशेष न्यायालये आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तपास करण्याची तरतूद सुचवण्यात आली आहे.
 

दुसरीकडे, एमपीएससीच्या परीक्षार्थींना परीक्षा शुल्क परत देण्याचीही महत्त्वपूर्ण शिफारस करण्यात आली आहे.परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक, एकदाच नोंदणी आणि परीक्षा केंद्रांवर कडक देखरेख यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न आहे.
 

उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल २३ नोव्हेंबरला शासनाला सादर झाला असून, आता या शिफारशींच्या अंमलबजावणीकडे लक्ष लागलं आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना आता थेट तुरुंगाची हवा आणि कोट्यवधींचा दंड बसणार का, हे सरकारच्या अंतिम निर्णयातून स्पष्ट होणार आहे!


पेपरफुटी करणाऱ्यांचे धाबे दणाणणार! १० कोटींचा दंड, १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिफारस!
Total Views: 6