बातम्या
शहाजी महाविद्यालयामध्ये 12 वी विद्यार्थ्यांची पालक सभा संपन्न
By nisha patil - 8/18/2025 4:24:27 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयामध्ये 12 वी विद्यार्थ्यांची पालक सभा संपन्न
मोबाईलच्या व्यसनापासून मुलांना दूर ठेवा : प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण
कोल्हापूर : सध्याच्या काळात मोबाईलच्या व्यसनापासून स्वतः पालकांनी बाजूला राहत विद्यार्थ्यांनाही दूर ठेवणे आवश्यक आहे. मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. मुलांच्या वरील संस्काराची शिदोरी त्याच्या आयुष्यभरासाठी लागू होण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा प्राचार्य डॉ आर के शानेदिवाण यांनी व्यक्त केली.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील कनिष्ठ विभागामार्फत 12 वी विद्यार्थ्यांच्या पालक सभेच्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे दादा यांचे प्रोत्साहन लाभले.स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थी पालक सभेच्या समन्वय डॉ. सौ ए.डी. पाटील यांनी केले. यावेळी पालक केदार शिंदे, सागर पाटील, पोपट बोरसे, ज्योती चव्हाण,विजय कुंभार, सारिका लोहार, ज्योती साठे, सानिका शिंदे, स्वाती लखमदे, उज्वला कुंभार यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. के. मोटे यांनी केले. आभार प्रा. पी. एच. पाटील यांनी मानले.
शहाजी महाविद्यालयामध्ये 12 वी विद्यार्थ्यांची पालक सभा संपन्न
|