बातम्या
किल्ले बनविणे स्पर्धेत उस्फुर्तपणे सहभाग घ्या - राजू यादव शिवसेना करवीर तालुका प्रमुख (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
By nisha patil - 10/14/2025 5:38:28 PM
Share This News:
किल्ले बनविणे स्पर्धेत उस्फुर्तपणे सहभाग घ्या - राजू यादव शिवसेना करवीर तालुका प्रमुख (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य गड किल्ले बनविणे स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा उंचगाव मर्यादित असणार आहे. गेली तीन वर्ष शिवसेनेच्या वतीने ही स्पर्धा राबवण्यात येत आहे. यासाठी एक रुपया इतकी माफक प्रवेश फी असणार आहे. तसेच प्रथम क्रमांक ३००१ व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास २००१ व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास १५०१ व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ १००१ व सन्मानचिन्ह तसेच उत्कृष्ट सादरीकरणास एक सन्मानचिन्ह अशाप्रकारे बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
उंचगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की,मुलांनीही यामध्ये सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा. व जास्तीत जास्त मंडळांनी यामध्ये सहभाग घेऊन मातीशी आपली नाळ जोडावी असे आवाहन राजू यादव यांनी केले.
स्पर्धेत नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा..
१) योगेश लोहार -८६६८५४४४८२
२) शरद माळी - ९८२३३९१११३
३) सागर पाटील -९८९०१५००९८
किल्ले बनविणे स्पर्धेत उस्फुर्तपणे सहभाग घ्या - राजू यादव शिवसेना करवीर तालुका प्रमुख (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
|