बातम्या

पारगड ते रायगड यात्रेत साहित्यिक कलावंतांचा सहभाग...   बुद्धिजीवींच्या सहभागामुळे सह्याद्री वाचवा मोहिमेला बळ... 

Participation of literary artists in the Pargad to Raigad Yatra


By nisha patil - 11/26/2026 3:09:30 PM
Share This News:



पारगड ते रायगड यात्रेत साहित्यिक कलावंतांचा सहभाग...   बुद्धिजीवींच्या सहभागामुळे सह्याद्री वाचवा मोहिमेला बळ... 

*आजरा(हसन तकीलदार)- "सह्याद्री वाचवा निसर्ग वाचवा" या मोहिमेअंतर्गत ३० नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या पारगड ते रायगड यात्रेत अनेक बुद्धिजीवी, लेखक, कवी, कलावंत, साहित्यिक सहभागी होणार आहेत. जेष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस, साहित्य अकादमी प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर, ज्येष्ठ रंगकर्मी नाट्य व सिनेकलावंत नंदकुमार पाटील, कवी गोविंद काजरेकर, अंकुश कदम, डॉ. विजया चिंडक यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नामवंत लेखक कवी कालावंतामुळे या यात्रेला बळ मिळत आहे. 

महाराष्ट्रात विशेषतः सह्याद्रीच्या अतिसंवेदनशील अशा प्रदेशात पंप स्टोरेज प्रकल्प आणले जात आहेत. हजारो हेक्टर जंगल जमीन यामुळे उद्ध्वस्त होणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी या प्रकल्पामुळे कडे वळवल्यामुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. जंगलावर अवलंबित असलेल्या स्थानिक आदिवासी आणि पारंपारिक वननिवासी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न तयार होणार आहे. जंगली जनावरे दुर्मिळ पशुपक्षी प्राणी यांच्या अधिवासावरच गंडांतर येणार आहे. भूजलाचे  प्रवाह बदलले जाणार आहेत. या विरोधात सह्याद्री वाचवा मोहीम होत आहे.

 या मोहिमेअंतर्गत पारगड ते रायगड जागरण यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेचा पहिला टप्पा पारगड ते पन्हाळगड असा असून त्याची सुरुवात 30 नोव्हेंबर पासून होत आहे. या यात्रेत साहित्यिक कलावंतांसह बुद्धिजीवींच्या सहभागामुळे लढणाऱ्या चळवळींना बळ मिळाले आहे. अशी माहिती या मोहिमेचे निमंत्रक कॉ संपत देसाई, प्रा सुनील शिंत्रे, कॉ सम्राट मोरे यांनी बोलतांना दिली.


पारगड ते रायगड यात्रेत साहित्यिक कलावंतांचा सहभाग...   बुद्धिजीवींच्या सहभागामुळे सह्याद्री वाचवा मोहिमेला बळ... 
Total Views: 47