बातम्या
पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सहभाग गरजेचा – सिद्धेश कदम
By nisha patil - 2/5/2025 9:57:50 PM
Share This News:
पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सहभाग गरजेचा – सिद्धेश कदम
'पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि संधी' विषयावर परिषद संपन्न
कोल्हापूर : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले. त्यांनी सांगितले की, नव्या पिढीचा सक्रिय सहभाग आणि ‘रिसायकल-रियुज’ हा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.
डी. वाय. पाटील ग्रुप आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि संधी’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कदम बोलत होते. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील आणि तेजस पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
परिषदेमध्ये ‘टेक-मेक-डिस्पोजल-पुन्हा मेक’ या संकल्पनेवर भर देण्यात आला. सिद्धेश कदम यांनी पर्यावरण संवर्धनासाठी कचऱ्याचे पुनर्वापरायोग्य रूपांतरण गरजेचे असल्याचे सांगितले.
ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक व पर्यटन विकासात पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, पंचगंगा नदीच्या 110 MLD सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरात आणले जात आहे.
परिषदेत भूषण कापसे, इंद्रकांत झा, अभिजीत घोरपडे, डॉ. शिंपा शर्मा, डॉ. अजय ओझा यांसारख्या तज्ज्ञांनी पर्यावरणीय धोरणे व संधी यावर सखोल विचार मांडला.
कार्यक्रमात ऋतुराज पाटील यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सुरेश भुस्कुटे यांनी केले तर प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी आभार मानले.
ही परिषद पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने कोल्हापुरातील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.
पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सहभाग गरजेचा – सिद्धेश कदम
|