बातम्या

 लोक अदालत मध्ये श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग" 

Participation of students of Shri Shahaji Chhatrapati College


By Administrator - 3/16/2026 3:41:23 PM
Share This News:



 लोक अदालत मध्ये श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग" 
     

कोल्हापूर: आज संपूर्ण भारतामधील सर्व न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार  लोक आदालतीचे आयोजन करण्यात आले होते. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर येथील राज्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी शनिवार दिनांक 14 मार्च रोजी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये संपन्न झालेल्या "लोक अदालत" प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन प्रत्यक्ष न्यायालयीन प्रक्रिया कोणत्या पद्धतीने पार पाडते याचा विद्यार्थ्यांना अनुभव घेता आला.

पुस्तकांमध्ये न्याय मंडळाचा लिखित स्वरूपात सैद्धांतिक  अभ्यास विद्यार्थी करतच असतात परंतु विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न्यायालयीन प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडते याचे ज्ञान या अभ्यास भेटीमुळे मिळाले. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्यक्ष ज्ञान व अनुभव यालाच जास्त प्राधान्य दिलेले आहे त्यामुळे या अभ्यास भेटीला विशेष महत्त्व आहे.या लोक आदालत प्रक्रियेदरम्यान फौजदारी न्यायालय प्रमुख, न्यायमूर्ती एम. एम. गादिया आणि दिवाणी न्यायालय प्रमुख, न्यायमूर्ती एस. बी. देवरे यांनी विद्यार्थ्यांना न्यायालयीन प्रक्रियेची माहिती दिली.

तसेच प्रत्यक्ष न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना न्यायमूर्ती व्ही. व्ही.गिराम( मॅडम ) व न्यायमूर्ती ए. ए. पठाण ( मॅडम) या न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजून सांगितली. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या पाच मजली बिल्डिंग मध्ये प्रत्येक विभागाचे काम कशा पद्धतीने चालते याची सविस्तर माहिती ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली. या लोक अदालत भेटीचे नियोजन प्रा.डॉ. विजय देठे, प्रा.डॉ. राहुल मांडणीकर व प्रा. मोरस्कर  यांनी केले . या अभ्यास भेटीस मा. मानसिंगराव बोंद्रे चेअरमन, श्री शाहू शिक्षण संस्था आणि प्राचार्य डॉ. आर. के. शहाणेदिवाण यांचे विशेष सहकार्य व प्रोत्साहन लाभले.


 लोक अदालत मध्ये श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग" 
Total Views: 60