राजकीय
पन्हाळा बस सेवेतील गैरव्यवस्थेवर प्रवाशांचा संताप; रास्ता रोको आंदोलनानंतर प्रशासनाचे आश्वासन
By nisha patil - 10/30/2025 2:10:43 PM
Share This News:
पन्हाळा(शहाबाज मुजावर):- पन्हाळा ते कोल्हापूर दरम्यान एस.टी. बसच्या फेऱ्या वेळेवर होत नसल्याने नागरिक, विद्यार्थी व कर्मचारी वर्गामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. एस.टी.च्या गलथान सेवेमुळे आणि वाहतूक नियंत्रकांच्या उद्धट वर्तनामुळे आज (दि. ३० ऑक्टोबर २०२५) पन्हाळा येथील नरवीर शिवा काशिद पुतळ्याजवळ भारतीय दलित महासंघ यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी एस.टी. बससेवा सुरळीत करावी, चालक-वाहकांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे, तसेच पन्हाळा मार्गावरील जीर्ण झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अशी प्रमुख मागणी केली. या आंदोलनात भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे (आप्पा) ,अनिरुध्द कांवळे,शहारूख पेटकर,दयानंद कांबळे,रमेश कासे,दिपक बानकर,पवन कार्तिक कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक रामानंद गोसावी,मारुती माने,मारुती पवार,संजय कांबळे,महेश जगदाळे,प्रमोद उदाळे, विनोद गायकवाड,शकिल मुत्तवल्ली,राजु मुत्तवल्ली,रमेश कासे,शहाबाज मुजावर,चेतन भोसले,धीरज कुऱ्हाडे,अख्तर मुल्ला,नियाज मुल्ला,इन्तखाफ आगा, आदी उपस्थित होते.
निवेदनानंतर तहसीलदार कार्यालयाकडून कळविण्यात आले की, वाहतूक नियंत्रक व चालक-वाहकांना प्रवाशांशी नम्रतेने वागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पन्हाळा मार्गावरील बसफेऱ्या वेळेत निघतील यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत.प्रशासनाच्या या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको मागे घेतला असून, मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास पुढील तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पन्हाळा बस सेवेतील गैरव्यवस्थेवर प्रवाशांचा संताप; रास्ता रोको आंदोलनानंतर प्रशासनाचे आश्वासन
|