बातम्या

महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत पार — ८१ जागांचे चित्र स्पष्ट!

Passing the reservation for the municipal elections


By nisha patil - 12/11/2025 4:40:46 PM
Share This News:



महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत पार — ८१ जागांचे चित्र स्पष्ट!

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत मंगळवारी शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात काढण्यात आली. अवघ्या दीड तासात पार पडलेल्या प्रक्रियेत २० प्रभागांतील ८१ जागांचे आरक्षण निश्चित झाले.

प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत पाच मुलांच्या हस्ते ही सोडत पार पडली. अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया पारदर्शक आणि विनाअडथळा राबवली.

सर्वसाधारण गटासाठी ४९ जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यापैकी २४ महिलांना संधी मिळेल. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी २१ जागा आरक्षित असून, त्यापैकी ११ महिलांसाठी आहेत. अनुसूचित जातीसाठी ११ जागा राखीव असून, सहा जागा महिलांसाठी आहेत.

हरकती व सूचना सादरीकरणाचा कार्यक्रम:

१७ नोव्हेंबर: आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध

१७ ते २४ नोव्हेंबर: हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत

ठिकाण: छत्रपती ताराराणी सभागृह, महापालिका मुख्यालय


आरक्षण प्रक्रियेनंतर आता नगरसेवकांच्या रिंगणाची तयारी सुरू झाली असून, शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.


महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत पार — ८१ जागांचे चित्र स्पष्ट!
Total Views: 24